तुम्हाला डॉक्टरांनी डिलिव्हरी ची एक due date दिलेली असते, पण नववा महिना लागला की Labor pains कधीही सुरु होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की आपण नंतर वेळ आल्यावर हॉस्पिटल बॅग भरू तर तुमचा असा विचार करणे चुकीचे आहे.
कारण जेव्हा प्रसव पीडा अचानक सुरु होते तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या मनस्थितीत नसता आणि त्यामुळे तुम्ही काही गोष्टी विसरू देखील शकता . त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काही अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. म्हणून हॉस्पिटल बॅग आधीपासूनच तयार करून ठेवणे गरजेचे आहे.
जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर तुम्हाला २ ते ३ दिवस हॉस्पिटल मध्ये राहावे लागते आणि जर तुमची सिझेरिअन डिलिव्हरी झाली तर ५ ते ७ दिवस हॉस्पिटल मध्ये राहावे लागते.
कधी कधी डिलिव्हरी दरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स येतात तुमच्या बाळाला काही health संबंधी प्रॉब्लेम झाले असतील तर अजून काही दिवस हॉस्पिटल मध्ये राहावे लागते.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला तुमची हॉस्पिटल बॅग तयार करावी लागते. जेणेकरून डिलिव्हरी च्या वेळी किंवा डिलिव्हरी नंतर तुमचे आणि तुमच्या बाळाचे जे काही आवश्यक सामान लागेल ते तुमच्याकडे available असेल ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटल मध्ये राहण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
येथे मी तुम्हाला प्रसूतीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे आवश्यक असलेल्या गोष्टींची Checklist किंवा यादी सांगत आहे. गर्भधारणेच्या किमान 32 व्या आठवड्यात Hospital Bag तयार करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
जर गोष्टी अपेक्षेपेक्षा आधी झाल्या आणि होणारी आई तयार नसेल तर ही परिस्थिती अतिरिक्त ताणतणावास कारणीभूत ठरू शकते, जे गर्भवती महिलेसाठी चांगले नाही.
म्हणूनच आपल्या हॉस्पिटलची बॅग वेळेवर तयार ठेवा. जेणेकरून तुम्हाला वेडेवर धावपळ होणार नाहीं आणि तुम्ही खास प्रसूतीच्या क्षणाचा आनंद घेऊ शकनार.
प्रसव किंवा डिलिव्हरी साठी हॉस्पिटल मध्ये जाताना न्यायची बॅग कधी तयार करावी ?। Delivery sathi Bag Pack kadhi karavi ?
हॉस्पिटल बॅग (Hospital Bag) किंवा मॅटर्निटी बॅग (Maternity Bag) ला Pregnancy च्या ३२ व्या आठवड्यापासून तयार करण्याचा सल्ला दिला जातो.
कारण तुम्हाला हॉस्पिटल बॅग मध्ये नेण्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी खरेदी कराव्या लागतात आणि आपल्या गरजेनुसार Pack कराव्या लागतात. त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो.
तुमची हॉस्पिटल ला जाण्यासाठी लागणारी बॅग ३६ व्या आठवड्यात पूर्णपणे तयार पाहिजे. कारण नवव्या महिन्यात कधीही डिलिव्हरी होऊ शकते.
त्यामुळे तुम्हाला पहिल्यापासूनच तयारी करावी लागते. जर गोष्टी अपेक्षेपेक्षा खूपच लवकर झाल्या आणि आई या सर्व गोष्टींसाठी तयार नसेल तर हे एक तणावाचे कारण ठरू शकते .आणि ही गर्भवती महिलेसाठी चांगली गोष्ट नाही .
त्यामुळे Hospital Bag वेळेवर तयार करा आणि डिलिव्हरी च्या गोड क्षणाची प्रतीक्षा करा .
आईसाठी लागणारे जरूरी सामान | नवजात शिशु साठी जरूरी सामान |
---|---|
1. महत्वाची कागदपत्रे (Important Documents) | 1. नवजात शिशु साठी कपड़े (Newborn Baby Clothes) |
2. आरामदायी चपला (sleeper) आणि मोजे (socks) | 2. स्वेटर (Sweater) |
3. हेअल्थी स्नैक्स (Healthy Snacks) आणि पेय पदार्थ (Drinkable Items ) | 3. डायपर (Baby Diapers) किंवा नैपी (Nappy) |
4. आरामदायी किंवा सुविधाजनक कपडे (Comfortable or Convenient Cloths) | 4. सूती लंगोट (Cloth Nappies) |
5. मॅटर्निटी ब्रा (Maternity Bras) किंवा नर्सिंग ब्रा (Nursing Bras) किंवा ब्रेस्ट पैड्स (Breast Pads) | 5. नवजात शिशु साठी उशी (Pillow) , चादर (Bedsheet) आणि मुलायम कांबळ (Soft Blanket) किंवा रजाई (Baby Quilt) |
6. अंडरवियर (Underwear Panties) किंवा मॅटर्निटी सॅनिटरी पॅड(Maternity Sanitary Pads) | 6. स्वैडल (Swaddle Cloth) |
7. टॉयलेटरीज़ (toiletries) किंवा अंघोळीचे सामान किंवा कॉस्मेटिक (cosmetic) किंवा मेकअप (make-up) च्या सामानाची बॅग | 7. नवजात शिशु चे Mittens मोज़े (Socks) आणि टोपी (Hat) |
8. गैजेट्स (Gadgets) आणि मनोरंजनाचे सामान (Entertainment goods) | 8. बेड प्रोटेक्टर mat किंवा Dry बेड प्रोटेक्टर शीट (Bed protector Mat or Dry Bed protector sheet) |
9. उशी (Pillow) , चादर (Bed sheet) कांबळ | 9. बेबी नेल क्लिपर किंवा बेबी नेल कटर (Baby Nail Clipper or Baby Nail Cutter) |
10. स्टोल (stole) किंवा दुपट्टा (scarf) | 10. डायपर बदलण्याची चटई (Diaper Changing Mat) |
11. स्वेटर (Sweater) आणि शॉल (Shawl) | 11. बेबी वाइप्स (Baby Wipes) आणि मुलायम सूती रूमाल (Soft Cotton Napkins) |
12. डिलिव्हरी नंतरची बेल्ट (Post Natal Maternity Support Corset belt or Post-Pregnancy Belt) | 12. बाळाला दूध पिण्यासाठी बाटली (Baby Feeding bottle) आणि चांदीची कटोरी आणि चमचा (Silver Bowl and Spoon) |
13. मास्क (Mask) आणि Sanitizer | 13. बेबी बिब्स (Baby bibs) |
14. डायपर बॅग (Diaper Bag) | 14. बाथरूम साठीचे जरुरी सामान (Baby Bath Essentials) |
15. स्तनपानासाठी सहायक उपकरण (Accessories for Breastfeeding) | 15. बेबी कार सीट (Baby Car seat) आणि स्लीपिंग बॅग (Sleeping Bag) |
आईसाठी प्रसूतीच्या वेळी लागणारे सामान
1. महत्वपूर्ण कागदपत्रे (Important Documents)
डिलिव्हरी किंवा प्रसूती च्या वेळी तुम्हाला काही महत्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये तुमची pregnancy file,मेडिकल रेकॉर्डस् किंवा रिपोर्ट्स,इन्शुरन्स कार्ड ,विमा दस्तऐवज आणि तुमचे ओळखपत्र किंवा ID card या सर्व गोष्टी तुमच्या हॉस्पिटल बॅग मध्ये आठवणीने ठेवा.
2. आरामदायी चपला (स्लीपर किंवा फ्लीप फ्लॉप्स) आणि मोजे (socks)
तुम्ही हॉस्पिटल मध्ये रूम मध्ये घालण्यासाठी एक फ्लॅट चप्पल आणि बाथरूम मध्ये घालण्यासाठी एक वेगळी चप्पल ठेवा. चप्पल घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चप्पल ची पकड मजबूत पाहिजे जेणेकरून ती हॉस्पिटल च्या टाईल्स वर घसरता काम नये.
त्याचबरोबर तुम्ही २ ते ३ जोड मोजे (सॉक्स) देखील ठेवू शकता ज्यामुळे तुमचे पाय खराब होणार नाहीत आणि तुमच्या पायाला थंडी सुद्धा लागणार नाही.
3. हेअल्थी स्नैक्स (Healthy Snacks) आणि पेय पदार्थ (Drinkable Item)
प्रसूती किंवा डिलिव्हरी च्या वेळी तुम्हाला भूकही लागू शकते त्यामुळे तुम्ही खाण्यासाठी काही पदार्थ ठेवून घ्या जसे कि तुम्ही फळं (fruits) खाऊ शकता किंवा फ्रूट्स जूस पिऊ शकता आणि बरोबर पिण्यासाठी पाणीही घ्या .
डिलिव्हरी नंतर खाण्यासाठी डिंकाचे लाडू ,मेथीचे लाडू किंवा अळिवाचे लाडू असे पौष्टिक पदार्थ ठेवा.
4. आरामदायी किंवा सुविधाजनक कपड़े (Comfortable or Convenient Cloths)
तुम्हाला डिलिव्हरी नंतर हॉस्पिटल मध्ये घालण्यासाठी आरामदायी (Comfortable)कपडे लागतात. तुम्ही जेवढे दिवस हॉस्पिटल मध्ये राहणार असाल त्या हिशोबाने तुम्हाला कपडे पॅक करावे लागतात.
Bag मध्ये तुम्ही 3 मॅटर्निटी गाउन ठेवा त्यामध्ये 2 गाउन रोज घालण्यासाठी आणि एक Extra गाउन कारण जर एक गाउन Bleeding मुळे किंवा बाळाला दूध पाजताना ख़राब झाला तर तुम्ही दूसरा Use करू शकता . गाउन ऐवजी तुम्ही Nursing Tops किंवा Pajamas घालू शकता. आणि रात्री घालण्यासाठी Night Dresses सुद्धा ठेवू शकता .तुम्हाला जे कपडे Comfortable वाटतात ते कपडे घाला .
त्याचबरोबर हॉस्पिटल मधून घरी जाताना घालण्यासाठीही काही कपडे ठेवा. हे कपडे आरामदायी किंवा सुविधाजनक असले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या बाळाला दूध पाजताना काही प्रॉब्लेम व्हायला नको. कपडे निवडताना हे लक्षात ठेवा की ते पोटाला जास्त घट्ट नसावेत.
5. मॅटर्निटी ब्रा (Maternity Bras) किंवा नर्सिंग ब्रा (Nursing Bras) आणि ब्रेस्ट पैड्स (Breast Pads)
हॉस्पिटल बॅग मध्ये तुम्ही 2 मॅटर्निटी ब्रा (Maternity Bras) किंवा नर्सिंग ब्रा (Nursing Bras) ठेवा. जी बाळाला दूध पाजताना कामात येणारी विशेष ब्रा असते.
त्याचबरोबर तुम्ही ब्रेस्ट पैड्स (Breast Pads) ठेवा. जे की जास्तीचे दूध (leakage) ला शोषून घेते. त्यामुळे तुमची ब्रा ओली होत नाही आणि तुम्हाला आरामदायी वाटते.
6. अंडरवियर (Underwear Panties) आणि मॅटर्निटी सॅनिटरी पॅड (Maternity Sanitary Pads)
हॉस्पिटल बॅग मध्ये तुम्ही 4 अंडरवियर (Underwear Panties)ठेवा. ब्लीडिंग मुले ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवून अंडरवियर पॅक करा. अंडरवियर किंवा पॅंटी आरामदायी असायला पाहिजे. जर तुमचे सीजेरियन ऑपरेशन करावे लागले तर तुमच्या पॅंटी चे इलास्टिक जास्त टाइट नको ,जेणेकरून तुमच्या टाक्यांवर त्याचा काही प्रभाव होणार नाही .
त्याचबरोबर तुम्हाला मॅटर्निटी सॅनिटरी पॅड (Maternity sanitary pads)चे कमीत कमी 2 पॅकेट ठेवायला हवेत.
डिलिव्हरी च्या वेळी किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर तुम्हाला खूप जास्त ब्लीडींग होते. त्यामुळे तुम्हाला पॅड घेणे जरुरी असते. मॅटर्निटी पॅड नॉर्मल सॅनिटरी पॅड पेक्षा मोठे असतात. त्यामुळे तुम्हाला याचा उपयोग करावा लागतो.
7. टॉयलेटरीज़ (toiletries) किंवा अंघोळीचे सामान आणि कॉस्मेटिक (cosmetic) किंवा मेक-अप (make-up) च्या सामानाची बॅग
तुम्हाला रोज वापरण्यासाठी टॉयलेटरीज़ (toiletries) आणि अंघोळीचे सामान आणि कॉस्मेटिक (cosmetic) किंवा मेक-अप (make-up) हे सामान हॉस्पिटल बॅग मध्ये जरूर ठेवा. जसे की टॉवेल , टूथब्रश, टूथपेस्ट, साबण,शॉवर जेल, शॅम्पू , कंडीशनर, लिप बाम, मॉइस्चराइजर किंवा लोशन, क्रीम, पाउडर, कंगवा , हेयर क्लिप, हेयर बैंड, ओले टिश्यू (वेट वाइप्स) हे सामान ठेवू शकता.
8. गैजेट्स (Gadgets) आणि मनोरंजनाचे सामान (Entertainment goods)
गैजेट्स (Gadgets) मध्ये तुमचा मोबाइल, चार्जर आणि हेडफोन किंवा इयरफ़ोन ठेवायला विसरू नका. तुम्हाला हॉस्पिटल मध्ये कंटाळा येऊ नये म्हणून मनोरंजनाचे सामान देखील ठेवू शकता. जसे की काही आवडीची पुस्तके , मॅगझीन तुम्हाला हॉस्पिटल मध्ये वेळ चांगला जाण्यास मदत होईल. जर तुम्ही चश्मा किंवा लेन्स वापरात असाल तर ते ठेवायला देखील विसरू नका.
9. उशी (Pillow) , चादर (Bedsheet) आणि कांबळ
जर तुम्हाला हॉस्पिटल मध्ये असलेली उशी (Pillow), चादर (Bedsheet) आणि कांबळ यांचा उपयोग करायचा नसेल तर या सर्व गोष्टी घरातूनच हॉस्पिटल बॅग मधून पॅक करून घेऊन जा. काही वेळा या सर्व गोष्टी हॉस्पिटल मधून Provide करत नाहीत त्या वेळी तुम्हाला हे सर्व घरातूनच न्यावे लागेल.त्याचबरोबर उशी तुम्हाला बाळाला breastfeeding करतानाच्या वेळी देखील कामी येऊ शकतो.
10. स्टोल (stole) किंवा दुपट्टा (scarf)
स्टोल (stole) किंवा दुपट्टा (scarf) सुद्धा हॉस्पिटल बॅग मध्ये ठेवा.बाळाला स्तनपान करवताना स्वतःला झाकून घेण्यासाठी कामास येतो.आणि Scarf ने तुम्ही डोके आणि कान बांधू शकता.
11. स्वेटर (Sweater) आणि शॉल (Shawl)
डिलीवरी च्या वेळी थंडीचे वातावरण असेल तर तुम्हाला स्वेटर (Sweater) आणि शॉल (Shawl) ठेवणे आवश्यक आहे.
12. डिलिव्हरी नंतर बांधायचा बेल्ट (Post Natal Maternity Support Corset belt or Post-Pregnancy Belt)
डिलीवरी नंतर तुम्हाला पोट बांधायचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे तुमच्या पोटाचा Shape लवकर नॉर्मल होण्यास मदत मिळेल. त्यामुळे तुम्ही डिलिव्हरी नंतर बांधायचा बेल्ट देखील हॉस्पिटल बॅग मध्ये ठेवा.
13. मास्क (Mask) आणि Sanitizer
आता देशात जो COVID-19 किंवा कोरोना वायरस (Corona Virus) ची जी Situation चालू आहे त्यामध्ये मास्क घालणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही हॉस्पिटल बॅग मध्ये मास्क आणि Sanitizer जरूर ठेवा.
14. डायपर बॅग (Diaper Bag)
नवजात शिशु चे सर्व आवश्यक सामान ठेवण्यासाठी एक बॅग ठेवा जी तुम्ही कॅरी करू शकता.
15. स्तनपानासाठी सहायक उपकरण (Accessories for Breast feeding)
एक सिलिकॉन चे Nipple ठेवा. जर डिलीवरी नंतर तुमच्या बाळाला तुमच्या निपल ने दूध पिताना काही प्रॉब्लेम होत असेल किंवा तुमचे निपल छोटे असतील तर तुम्ही सिलिकॉन च्या nipple चा उपयोग करु शकता.
तुम्ही एक ब्रेस्ट पंप देखील ठेवू शकता. जर तुमचे बाळ दूध पिऊ शकत नसेल तर तुम्ही ब्रेस्ट पंप च्या सहायतेने दूध काढून ते बाटली मध्ये भरून ते बाळाला पाजू शकता.
बाळासाठी तुम्ही आरामदायी सुती कपडे ठेवा. जेवढे दिवस तुम्हाला हॉस्पिटल मध्ये राहायचे असेल त्या हिशोबाने एक एक जोडी कपडे ठेवा. जर तुम्ही घरी परत जाताना काही वेगळे कपडे घालणार असाल तर ते देखील पॅक करून घ्या.
बाळाला आत घालण्यासाठी ४ बनियान देखील ठेवा. जर उन्हाळ्याचा season असेल तर मुलासाठी एक थर देखील पुरेसा आहे.
2. स्वेटर (Sweater)
थंडी च्या season मध्ये तुम्हाला नवजात शिशु ला स्वेटर घालणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही 2 जोड स्वेटर चे जरूर ठेवा.
3. डायपर (Baby Diapers) किंवा नॅपी (Nappy)
तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाला जन्माला आल्यावर लगेचच डायपर (Baby Diapers) किंवा नॅपी (Nappy)घालू शकता. तुम्हाला बाळासाठी रोज १० ते १२ डायपर लागू शकतात. तुम्हाला त्या हिशोबाने डायपर पॅक करायचे आहेत.
लक्षात ठेवा की नवजात शिशुला चांगल्या ब्रँड चे डायपर घाला. आणि Market मध्ये Newborn Baby साठी Soft वाले डायपर देखील मिळतात. शक्य असेल तर तुम्ही तेच असे करा.
4. सूती लंगोट (Cloth Nappies)
काही लोकांची नवजात शिशु ला डायपर घालायची इच्छा नसते. ते बाळाला लंगोट घालणे पसंत करतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाला लंगोट देखील घालू शकता.रोज तुम्हाला नवजात शिशु साठी 18 ते 20 लंगोट लागतात. त्यामुळे तुम्हाला त्या हिशोबाने लंगोट पॅक करावे लागतील.
त्याचबरोबर दिवसभर बाळांना डायपर मध्ये ठेवणे चांगले नाही. त्यांना काही वेळासाठी लंगोट देखील घातले पाहिजेत.
बाळासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या उशा मिळतात. ज्यामुळे बाळाचे डोके बरोबर स्थिर राहते त्यादेखील तुम्ही घेऊ शकता.
तुम्हाला नवजात शिशु च्या बेड वर घालण्यासाठी २ सुटी चादर ठेवणे देखील जरुरी आहे. त्याचबरोबर बाळाला झोपायच्या वेळी घेण्यासाठी एक मुलायम कांबळ देखील ठेवा. ज्यामुळे बाळाला झोपताना थंडी लागणार नाही आणि त्याला ऊब मिळेल.
6. स्वैडल (Swaddle Cloth)
स्वैडल म्हणजेच बाळाला एका कपड्यामध्ये लपेटून ठेवा.हल्ली डॉक्टर जन्मानंतर नवजात शिशु ला स्वैडल करण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे बाळाला सुरक्षित वाटते. आणि त्याची झोप पूर्ण होऊ शकते. तुम्ही 2 स्वैडल व्रैप (Swaddle Wrap) हॉस्पिटल बॅग मध्ये जरूर ठेवा.
तुम्हाला 3 जोड नवजात शिशुचे (Mittens) ठेवायचे आहेत ज्यामुळे तो स्वतःला ओरबाडणार नाही कारण नवजात शिशूची नखे खूप धारदार असतात.
त्याचबरोबर मोज्यांचे (Socks) देखील ३ जोड ठेवा. ज्यामुळे पायांना थंडी लागणार नाही. आणि २ ते ३ जोड कानटोपी देखील ठेवा ज्यामुळे बाळाचे डोके आणि कान झाकले जातील.
8. बेड प्रोटेक्टर मॅट किंवा ड्राय बेड प्रोटेक्टर शीट (Bed protector Mat or Dry Bed protector sheet)
नवजात बाळाच्या अंथरुणावर घालण्यासाठी 1 किंवा 2 बेड प्रोटेक्टर शीट्स (Bed protector Sheet) किंवा प्लास्टिक शीट्स लागतील जेणेकरून बाळाचा बेड ओला होऊ नये. त्यामुळे तुम्ही ते देखील हॉस्पिटलच्या बॅगमध्येही ठेवले पाहिजे.
9. बेबी नेल क्लिपर किंवा बेबी नेल कटर (Baby Nail Clipper or Baby Nail Cutter)
जन्मानंतर, नवजात बाळाच्या हाता पायाची नखे मोठी असतात. त्यामुळे तुमची इच्छा असल्यास तुम्ही बाळाची नखे क्लिपर किंवा कटरच्या मदतीने कापू शकता.
10. डायपर बदलण्यासाठी चटई (Diaper Changing Mat)
हॉस्पिटल बॅग मध्ये तुम्ही 1 डायपर बदलण्यासाठी चटई ठेवा. (Diaper Changing Mat) त्यामुळे डायपर किंवा बदलण्याच्या वेळी अंथरूण खराब होणार नाही.
11. बेबी वाइप्स (Baby Wipes) आणि मुलायम सूती रूमाल (Soft Cotton Napkins)
हॉस्पिटल बॅग मध्ये 1 बेबी वाइप्स (Baby Wipes) चे पॅकेट ठेवा.आणि त्याचबरोबर बाळाचे स्तनपान झाल्यावर त्याचे तोंड पुसण्यासाठी किंवा त्याला उलटी झाली तर तोंड पुसण्यासाठी ८ ते १० मुलायम सुटी रुमाल देखील ठेवा.
12. बाळाला दूध पिण्यासाठी बाटली (Baby Feeding bottle) किंवा चांदीची वाटी आणि चमचा (Silver Bowl and Spoon)
डिलिव्हरी नंतर कधी कधी आईला लवकर दूध येत नाही. त्यावेळी बाळ भुके राहू नये यासाठी त्याला फॉर्मुला मिल्क दिले जाते.
त्या दरम्यान तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाटली ने दूध पाजू शकता किंवा चांदीची वाटी आणि चमच्याने देखील दूध पाजू शकता. नवजात शिशुला इन्फेकशन होण्याचे चांसेस जास्त असतात. त्यामुळे तुम्ही बाळासाठी चांदीच्या वस्तूंचा उपयोग केला पाहिजे. कारण चांदीमध्ये (Antibacterial) गुण असतात .
13. बेबी बिब्स (Baby bibs)
नवजात शिशु चे कपडे दूध पिताना खराब होऊ नयेत यासाठी तुम्ही बेबी बिब (Baby bib) चा वापर करू शकता. हॉस्पिटल बॅग मध्ये तुम्ही 2 बेबी बिब्स (Baby bibs) ठेवा.
14. बाथरूम साठी जरुरी सामान (Baby Bath Essentials)
नवजात शिशु च्या अंघोळीसाठी देखील काही सामान आवश्यक आहे.जसे की बेबी क्लींजर, बेबी शॅम्पू , मालिश चे तेल, बेबी हेयरब्रश, बेबी लोशन, बेबी क्रीम इत्यादी .
15. बेबी कार सीट (Baby Car seat) आणि स्लीपिंग बॅग (Sleeping Bag)
बाळाला सुरक्षित घरी नेण्यासाठी तुम्ही बेबी कार सीट (Baby Car seat) आणि स्लीपिंग बॅग (sleeping Bag) चा देखील वापर करू शकता.
बाळाच्या वडिलांसाठी किंवा हॉस्पिटल मध्ये तुमच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीसाठी लागणारे जरुरी सामान
1. कॅश (Cash) आणि एटीएम कार्ड (ATM Card)
हॉस्पिटल मध्ये तुम्हाला पैशांची गरज असते. त्यामुळे तुमच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीकडे थोडे फार पैसे किंवा ATM Card असणे आवश्यक आहे. त्यामुळे गरज लागल्यास तुम्हाला इकडेतिकडे धावाधाव करावी लागणार नाही.
2. गैजेट्स (Gadgets)
मोबाइल तर आपल्याजवळ असतोच पण बऱ्याच वेळा आपण चार्जेर घ्यायला विसरतो. मोबाइल बरोबर charger ठेवणे देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही हेडफोन देखील ठेवू शकता.
3. Snacks आणि पेय पदार्थ (Drinkable Item)
तुम्हाला तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीसाठी देखील खाण्याचे थोडे सामान पॅक करून घेतले पाहिजे. कारण ही व्यक्ती दिवसभर तुमच्याबरोबर राहणार असते त्यामुळे खाण्या पिण्यासाठी जास्त वेळा बाहेर जाऊ शकत नाही.
4. कपडे (Cloths)
तुम्ही जेवढे दिवस हॉस्पिटल मध्ये राहणार असाल तेवढे दिवस तुमचा साथी देखील तुमच्याबरोबर राहतो. त्या हिशोबाने त्याचे कपडे देखील पॅक करावे. जर थंडीचा season असेल तर स्वेटर ठेवायला विसरू नका. त्याचबरोबर अंडरवेअर देखील ठेवा.
5. मास्क (Mask) आणि Sanitizer
कोरोना वायरस (Corona Virus) पासून वाचण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीसाठी मास्क (Mask) आणि Sanitizer ठेवणे गरजेचे आहे.
6. टॉयलेटरीज़ (Toiletries) किंवा अंघोळीचे सामान
रोज वापरायचे टॉयलेटरीज़ (Toiletries)किंवा अंघोळीचे जरुरी सामान तुमच्यासाठी आणि तुमच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीसाठी घेणे आवश्यक आहे.
7. उशी (Pillow) , चादर (Bedsheet) आणि कांबळ
तुमच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीसाठी उशी (Pillow) , चादर (Bedsheet) आणि कांबळ देखील अवश्य ठेवा.
या गोष्टी हॉस्पिटल बॅग मध्ये घेऊन जाऊ नका
- तुम्ही महागडी आकर्षक ज्वेलरी घरीच ठेवा.
- हॉस्पिटल मध्ये तुम्हाला डिलिव्हरी च्या वेळी सर्व ज्वेलरी काढून ठेवावी लागते त्यामुळे ती चोरी देखील होऊ शकते.
- तुम्ही हॉस्पिटल मध्ये काही फालतू चे सामान घेऊन जाऊ नका ज्याची काही आवश्यकता नसेल.
- ज्या कपड्यांची तुम्हाला आवश्यकता नसेल त्या पॅक करू नका.
- जी औषधे घेण्यास तुम्हाला डॉक्टरने मनाई केली असेल त्या देखील पॅक करू नका.
Note- सर्व हॉस्पिटल चे Rules वेगवेगळे असतात त्यामुळे हॉस्पिटल बॅग पॅक करण्यापूर्वी तुम्हाला माहिती करून घेणे आवश्यक आहे की हॉस्पिटल मध्ये तुमच्या साठी काय available आहे. त्या हिशोबाने हॉस्पिटल बॅग पॅक करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर तुम्हाला हॉस्पिटल मध्ये कोणत्या गोष्टी नेण्याची परवानगी आहे आणि कोणत्या नाही या सर्व गोष्टींची माहिती करून घेणे आवश्यक आहेत्यामुळे तुम्हाला डिलिव्हरी च्या वेळी काही त्रास होणार नाही.
जर तुम्ही corona काळात (Corona Period) मध्ये डिलिव्हरी किंवा प्रसूती च्या वेळचे हॉस्पिटल बॅग किंवा मॅटर्निटी बॅग मध्ये जाण्याचे सामान ऑनलाईन खरेदी करू इच्छिता तर तुम्ही आमचे हे आर्टिकल जरूर वाचा.
तर ही corona काळामध्ये आई आणि बाळासाठी लागणाऱ्या आवश्यक सामानाची माहिती होती. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडेल. आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
जर तुम्हाला याविषयी काही प्रश्न (Doubts) असतील काही शंका असतील तर Comment Box मध्ये जरूर लिहा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.