गर्भधारणा किंवा गर्भवती होण्यासाठी काय करावे? गर्भधारणा कशी करायची? हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इथे जरूर मिळेल. त्याचबरोबर Pregnant होण्याची सर्व माहिती सुद्धा मिळेल.
हल्ली लोक लग्नानंतर बाळाचा विचार किंवा pregnancy conceive करण्यासाठी थोडा उशीर करतात. कारण त्यांना एकमेकांना जाणून घ्यायचे असते. आर्थिकदृष्ट्या स्थिर म्हणजेच Financially Stable व्हायचे असते. करियर (career ) मध्ये सेट (set )व्हायचे असते. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीने जेव्हा सर्व चांगले होते तेव्हा ते conceive होण्याचे Planning करतात.
परंतु जेव्हा pregnancy साठी try करणे सुरु करतात तेव्हा कधी कधी ३ ते ४ महिने try करूनसुद्धा conceive करण्यासाठी त्रास होतो आणि मंथली पिरियड सायकल तसाच चालू राहतो.
महिलांमध्ये गर्भ कसा राहतो
जेव्हा आपले पिरियड सायकल म्हणजेच मासिक पाळी नॉर्मल (Normal )असते म्हणजेच २८ ते ३० दिवसांची असते तेव्हा आपल्या पिरियड च्या सुरुवातीपासूनच पहिल्या दुसऱ्या दिवसापासून एक अंडे (Egg) मोठे होणे सुरु होते त्याला आपण फॉलिकल (follicle) असे म्हणतो.
हे follicles फक्त द्रवाने भरलेली एक लहान पिशवीअसते, यात एक लहान अंडेअसते. मासिक पाळीच्या (Period Cycle) मध्यभागी, म्हणजे 12 ते 14 दिवसात, ते सुमारे 20mm आकाराचे बनते, त्यानंतर हे अंडे (egg) release होते, म्हणजेच ते फुटते, आपण त्याला ओव्हुलेशन (Ovulation) म्हणतो.
Ovulation नंतर, हे अंडे (Egg) खूपच लहान राहते की त्याचा आकार फक्त 120 micron असतो. जेव्हा ही Egg शरीरात सोडली जाते, तेव्हा आपली फॅलोपियन ट्यूब (Fallopian Tube ) ती पकडण्याचा (capture) प्रयत्न करते आणि ती फॅलोपियन ट्यूबच्या एम्पलरी रिजिन (Ampullary Region) मध्ये म्हणजेच फॉलोपिअन ट्यूब मध्ये Ampulla नावाचा region राहतो तो यामध्ये येऊन Egg बसतो.
Ovulation नंतर, हे अंडे फक्त १८ ते २० तासांसाठी जिवंत राहते, त्याची फळ देण्याची क्षमता (Potential) फक्त १८ ते २० तासांपर्यंत राहते, त्या काळात ते sperm म्हणजेच शुक्राणूमध्ये मिसळले जाते, त्यानंतर conceive होण्याचे chances असतात.
जर १८ ते २० तासांमध्ये sperm बरोबर त्याचे मिलन झाले नाही तर येणाऱ्या दिवसात next पिरियड सुरू होतो.
गर्भधारणा किंवा गर्भवती होण्यासाठी काय करावे
जेव्हा पिरियड किंवा मासिक पाळी नॉर्मल असते म्हणजेच २८ ते ३० दिवसांची राहते तेव्हा Pregnant होण्यासाठी पिरियड च्या ११ व्या दिवसापासून ते २० व्या दिवसापर्यंत एक दिवस सोडून (alternate days ) मध्ये एकत्र रहावे लागते कारण इंटरकोर्स (Intercourse ) नंतर स्त्री च्या शरीरात sperm म्हणजेच शुक्राणू जवळजवळ ५ ते ७ दिवस जिवंत राहू शकतो. आणि त्या दरम्यान ओव्यूलेशन झाले तर conception म्हणजेच pregnancy होण्याचे चांसेस जास्त असतात.
गर्भधारणा न होण्याची कारणे
काही लोकांना गर्भधारणा होण्यात अडचणी येतात, त्याची अनेक कारणे असू शकतात, यासाठी Semen Analysis (वीर्य विश्लेषण) करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये sperm count नॉर्मल असले पाहिजे. त्याची हालचाल सामान्य असावी, त्याची रचना सामान्य असावी आणि Healthy Pregnancy साठी DNA Fragmentation सुद्धा नॉर्मल असले पाहिजे. म्हणून sperm analysis करणे खूप आईएम Important आहे .
गर्भधारणेसाठी अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे फॅलोपियन ट्यूबची (Fallopian Tube ) ची Patency . जेव्हा फॅलोपियन ट्यूब Clogged किंवा Blocked असते तेव्हा एका बाजूने जो egg येतो तो ट्यूबमध्ये बसते आणि दुसऱ्या बाजूने sperm जाऊन त्याला मिळतो, तेव्हा हे मिलन possible होत नाही त्यामुळे conception म्हणजेच गर्भधारणेची शक्यता खूप कमी होते. त्यामुळे Fallopian Tube नॉर्मल असणे खूप जरुरी असते.
गर्भवती होण्यासाठी योग्य वेळ (प्रेग्नेंट होण्याची योग्य वेळ)
गर्भधारणा होण्यासाठी वयाच्या ३० वर्षाच्या आत प्रयत्न करणे अधिक चांगले असते. ३० वर्षानंतर प्रेग्नेंट राहण्यामध्ये complications येऊ शकतात.
गर्भधारणा किंवा गर्भवती होण्यासाठी कही टिप्स (Tips For Pregnancy in Marathi)
- आपली पिरियड सायकल किंवा मासिक पाळी नॉर्मल असायला हवी. जेव्हा आपली period ची cycle नॉर्मल नसते तेव्हा आपल्याला हॉर्मोनल टेस्ट करावी लागते. डॉक्टरांच्या मदतीने Treatment घेऊन पिरियड सायकल नॉर्मल करणे जरुरी असते.
- आपले शरीर देखील conception साठी योग्य असावे लागते. त्यासाठी काही इम्पॉर्टन्ट ब्लड टेस्ट असतात त्या कराव्या लागतात.
- प्रेग्नेंट होण्यासाठी sperm देखील Healthy असावे लागतात. त्यासाठी सिमेन एनालिसिस (Semen Analysis) करावे लागते. आपल्या वीर्य मध्ये शुक्राणूंची संख्या आणि त्याचा मृत्यू दर (mortality) चांगला असला पाहिजे.
- यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे आपल्या fallopian tube ची Patency चांगली असली पाहिजे. Tube उघडी असली पाहिजे ती blocked नसावी.
- आणि याचबरोबर जेव्हा आपला Period Cycle नॉर्मल असतो तेव्हा आपला ओव्यूलेशन (Ovulation) वेळेवर होणे देखील खूप इम्पॉर्टन्ट असते. काही महिलांना ओव्यूलेशन उशिरा होते. त्यासाठी आपल्याला ओव्यूलेशन कधी होणार हे जाणणे देखील जरुरी असते. जर ओव्यूलेशन time वर होत नसेल तर त्या हिशोबाने pregnancy साठी Try करावे लागते.
- Pregnant होण्यासाठी ओव्यूलेशन (Ovulation) झाल्यानंतर १८ ते २० तासांच्या आत Sperm चे egg बरोबर मिलन होणे जरुरी असते.
गर्भधारणे विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ On How To Get Pregnant Fast In Marathi)
मासिक पाळीच्या 15 दिवस आधी कधीही ओव्हुलेशन होऊ शकते. ओव्हुलेशन नंतर, अंड फक्त 18 ते 20 तास जिवंत राहते, या काळात शुक्राणू सोबत Egg चा मिलन झाले, नंतर गर्भधारणा होते.
मासिक पाळी चुकल्यानंतर, गर्भधारणा चाचणी करूनच आपण गर्भवती आहात की नाही हे समजते.
मासिक पाळीच्या 15 दिवस आधी कधीही ओव्हुलेशन होऊ शकते. ओव्हुलेशन नंतर गर्भधारणा होते.
गर्भधारणेसाठी मासिक पाळीच्या 8 दिवसा पासून ते 19 दिवसा पर्यंत संबंध ठेवावे.
जर तुम्हाला पिरियड आले नसतील किंवा तुम्हाला कधीच पिरियड येत नसतील तर तुम्ही प्रेग्नेंट होऊ शकणार नाही. पण जर तुम्हाला पिरियड येत असतील आणि तुमची पिरियड सायकल रेगुलर असेल तर पिरियड मिस होणे हे प्रेग्नेंट होण्याचे लक्षण मानले जाते.
तर ही होती गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक गोष्टींची माहिती. मला अशा आहे की तुम्हाला हा लेख आवडेल आणि तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.
जर तुम्हाला How To Get Pregnant Fast In Marathi याविषयी काही शंका (Doubts) असतील तर तुम्ही Comment Box मध्ये जरूर लिहा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.
अधिक वाचा :