भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 31 जुलै 2016 च्या एपिसोडमध्ये प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. गर्भवती महिलांना पोटभर आहार मिळावा त्या कुपोषित राहू नयेत यासाठी काही योजना आखल्या आहेत. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान सुरू केले आहे. या प्रोग्राम अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला सर्व गर्भवती महिलांना सर्वव्यापी, खात्रीशीर, सर्वसमावेशक आणि दर्जेदार जन्मपूर्व काळजी प्रदान करण्याचा हेतू आहे.
या योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा महिलांना रोख रक्कम व पोषक आहार मिळतो. आपल्या देशात अशा काही महिला आहेत ज्या परिस्थिती अभावी कुपोषित राहतात. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळावर देखील होतो. हे टाळण्यासाठी सरकार अशा महिलांना काही रोख रक्कम देते.
गरीब वर्गातील महिला प्रेग्नेंसी मध्ये देखील रोजगारासाठी प्रेग्नेंसी च्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करीत असतात. त्यामुळे त्यांच्या वजनात पुरेशा प्रमाणात वाढ होत नाही. डिलिव्हरी नंतर देखील त्या लगेच कामाला लागतात. त्यामुळे त्यांचे शरीर परत पूर्वावस्थेत येण्यास अडथळा निर्माण होतो. त्या त्यांच्या बाळाचे पहिल्या सहा महिन्यांपर्यंत देखील Breastfeeding व्यवस्थित करू शकत नाहीत. त्यामुळे अशा महिलांचे होणारे नुकसान अंशतःभरून काढण्यासाठी सरकारने या योजना आखल्या आहेत.
या योजनांचा मुख्य हेतू गर्भवती (Pregnant) आणि स्तनपान (Breastfeeding) करणाऱ्या महिलांना वेतन हानीची भरपाई म्हणून रोख रक्कम प्रदान करणे तसेच त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारणे आणि पौष्टिक अन्न मिळवणे आहे. या योजनांमुळे आपल्या देशातील मृत्युदर कमी होण्यास देखील मदत होत आहे.
गर्भवती महिलांसाठी सरकारी योजना : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY)
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (Pradhan Mantri Matritva Vandana Yojana) (PMMVY) |
योजनेचा प्रकार | केंद्र सरकारची योजना |
विभाग | महिला व बालके विकास मंत्रालय |
अर्ज करण्याची तारीख | सुरु आहे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | घोषित नाही |
लाभार्थी | गर्भवती स्त्री |
लाभ | 6000 रु |
अर्ज करण्याचे माध्यम | ऑनलाइन किंवा ऑफलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | https://wcd.nic.in |
हेल्पलाइन क्रमांक | 011-23382393 |
प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा उद्देश (PMMVY)
- आपल्या देशात ज्या महिला मजुरीचे किंवा कष्टाचे काम करतात त्यांचे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांना पुरेसा आहार आणि पुरेशी विश्रांती मिळण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.
- गर्भवती व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा केल्यास जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारते, त्याचसोबतच प्रसूतीपुर्व व प्रसूतीनंतर महिलांना आपल्या बुडणाऱ्या रोजगाराची चिंता पडू नये यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात गेल्या 1 जानेवारी 2017 पासून सुरू केली आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निषक, कार्यपध्दती व केंद्र शासनाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे या योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यास मंजुरी देण्यात आली आहेत. योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवांचे आयुक्त हे राज्य पातळीवरील समन्वय अधिकारी असतील
- गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांचे आरोग्य सुधारणे आणि कुपोषणाचा प्रभाव कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोचवण्याचा भारत सरकारद्वारे प्रयत्न केला जात आहे.
- प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत मृत्यूचे प्रमाणही कमी होईल.
प्रधानमंत्री मातृत्व योजना कोणासाठी आहे?
आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केली. यां योजनेअंतर्गत ज्या महिला पहिल्यांदा आई होणार आहेत त्या याचा लाभ घेऊ शकतात.
- ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.
- नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ अनुज्ञेय राहील.
प्रधानमंत्री मातृत्व योजनेची (PMMVY) पात्रता
- गर्भधारणा सहाय्य योजनेसाठी अर्ज करणाऱ्या गर्भवती महिलांचे वय 19 वर्षांपेक्षा कमी नसावे
- या योजनेअंतर्गत ज्या महिला 1 जानेवारी 2017 किंवा त्यानंतर गर्भवती झाल्या आहेत त्यांना पात्र मानले जाईल.
प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा लाभ कोणाला होणार नाही
- जे गर्भवती महिला आणि स्तनदा मातां केंद्र किंवा राज्य सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये नियमित नोकरी करतात.
- जे गर्भवती महिला आणि स्तनदा मातां इतर कोणत्याही योजना किंवा कायद्यांतर्गत समान लाभ प्राप्त करतात.
प्रधानमंत्री मातृत्व योजनेद्वारे मिळणारी रक्कम
प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत मातांना सहा हजार (6000) रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही मदत तीन टप्प्यात दिली जाते.
- गर्भधारणेच्या वेळी
- बाळाला जन्म दिल्यानंतर
- बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर त्याच्या लसीकरणाच्या वेळी
या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवीकेद्वारा विवाहानंतर महिलेची नोंदणी केली जाते. ही नोंदणी नजीकच्या अंगणवाडी केंद्रात करू शकतो.
प्रधानमंत्री मातृत्व योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents)
या योजनेसाठी खालील कागदपत्रे (documents) आवश्यक आहेत.
- योग्यरित्या भरलेला अर्ज 1 ए
- MCP कार्डची प्रत
- ओळख पुराव्याची प्रत (ID Proof copy)
- बँक/पोस्ट ऑफिस खात्याच्या पासबुकची प्रत
- अर्जदार आणि तिचे पती यांनी योग्यरित्या स्वाक्षरी केलेले एक उपक्रम/संमती (Consent)
प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा फायदा कोणाला होईल?
- गर्भधारणा सहायता योजना 2021 चा लाभ मुख्यतःअशा गरोदर महिलांना मिळेल की ज्या कामगार वर्गातील आहेत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्या गर्भधारणेच्या वेळी त्यांच्या आरोग्याशी संबंधित गरजा पूर्ण करू शकत नाहीत आणि पैशांच्या अभावामुळे बाळाची काळजी घेऊ शकत नाहीत.
- या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या वेळेच्या गरजा पूर्ण करता येतील आणि ते बाळाची काळजी घेऊ शकतील.
- या योजनेअंतर्गत प्राप्त झालेली रक्कम थेट गर्भवती महिलांच्या बँक खात्यावर पाठवली जाईल.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी संपर्क:
ग्रामीण क्षेत्र:
एएनएम पात्र लाभार्थींना विनाशूल्य विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल व परिपूर्ण अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे सादर करेल. हा अर्ज भरण्याची जबाबदारी एएनएमची राहील. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे जमा करतील. विहित संकेतस्थळावर तालुका अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरण्यात येईल. राज्यस्तरावरुन संगणक प्रणालीद्वारे थेट लाभ अदा करण्यात येईल.
नगरपालिका क्षेत्र :
एएनएम पात्र लाभार्थीना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल. परिपूर्ण अर्ज हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करतील. मुख्याधिकारी विहित संकेतस्थळावर लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरतील.
महानगरपालिका क्षेत्र :
मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रात एएनएम पात्र लाभार्थीं महिलेला विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारतील. परिपूर्ण अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.
गर्भवती महिलांना कोणते फायदे मिळतील?
- गर्भवती महिलांनी त्यांच्या क्षेत्रातील ANMs / ASHA / आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून जवळच्या शासकीय आरोग्य सुविधेची माहिती मिळवावी जिथे PMSMA सेवा प्रदान केली जाईल. जेव्हा एखादी गर्भवती महिला PMSMA सेवा पुरवण्यासाठी नियुक्त केलेल्या सरकारी आरोग्य सुविधेला (DH, SDH, CHC-FRUs इत्यादी) भेट देते, तेव्हा तिला खालील सेवांचा संच प्रदान केला जाईल.
- नोंदणी(Registration): एएनएम / स्टाफ नर्स पीएमएसएमए केंद्रात येणाऱ्या pregnent महिलेची नोंदणी करेल आणि तिला आई आणि बाल संरक्षण कार्ड (Mother and Child Protection Card)आणि सुरक्षित मातृत्व पुस्तिका(Safe Motherhood booklet.) प्रदान करेल.
- परीक्षा(Examination): स्टाफ नर्स/एएनएम गर्भवती महिलेची उंची (Height) आणि वजन (Weight) घेईल, तिची नाडी (Pulse) आणि बीपी (BP) तपासेल आणि निष्कर्षांची (diagnostics) नोंद करेल आणि आईला निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत(Lab) पाठवेल.
- प्रयोगशाळेतील तपासण्या (Lab Investigations): Hemoglobin, Urine Albumin and Sugar, Malaria, VDRL, HIV, Blood Grouping, Screening for GDM using OGTT etc.
- अल्ट्रासोनोग्राफी (यूएसजी) Ultrasonography (USG): नोंदणी केलेले सर्व PMSMA beneficiaries त्यांच्या तपासणीच्या अहवालासह प्रसूतिशास्त्र / वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून परीक्षा घेतील. तपासणी आणि तपास अहवालांच्या आधारे आणि USG अहवालांच्या आधारावर, high risk असलेल्या महिलांच्या MCP कार्डवर लाल स्टिकर(red sticker) / शिक्का(stamp) जोडला जाईल.
- इंजेक्शन टिटॅनस टॉक्सॉइड (Injection Tetanus Toxoid), टॅब्लेट आयरन फॉलिक (Tablet Iron Folic Acid) टॅब्लेट कॅल्शियम(Tablet Calcium) आणि वैद्यकीय अधिकाऱ्याने लिहून दिलेली इतर औषधे(other medication prescribed by the Medical Officer)
- सर्व गर्भवती महिलांना आहार (diet), झोप (sleep), नियमित ANC तपासणी (regular ANC check up), संस्थात्मक प्रसूती (institutional delivery), स्तनपान (breast feeding), गर्भनिरोधक (contraceptives) इत्यादींवर समुपदेशन (10-12 गटांमध्ये) प्राप्त होईल.
- कठीण / दुर्गम भागात राहणाऱ्या गर्भवती महिलांना वाहतुकीच्या सुविधा पुरवल्या जातील जेथे सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही.
- एमसीपी(MCP) कार्डवर लाल स्टिकर असलेल्या गर्भवती महिलांनी प्रसूतिशास्त्रज्ञ / वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने जवळच्या सरकारी आरोग्य सुविधांना भेट दिली पाहिजे आणि आपत्कालीन प्रसूती काळजी सेवा (FRU – SDH, CHC, DH / Medical कॉलेज हॉस्पिटल)
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (2021) मध्ये अर्ज कोणी आणि कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना PMMVY अंतर्गत मातृत्व लाभ घेण्यासाठी ऑनलाइन (Online) प्रक्रिया:
- https://pmmvy-cas.nic.in ला भेट द्या आणि योजनेच्या सुविधा (AWC/मंजूर आरोग्य सुविधा) लॉगिन तपशीलांचा वापर करून PMMVY सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन करा.

- New Beneficiary tab (ज्याला अर्ज फॉर्म 1 ए असेही म्हणतात) नुसार तपशील भरून योजने अंतर्गत नोंदणी करण्यासाठी New Beneficiary टॅबवर क्लिक करा. फॉर्म भरण्यासाठी तुम्ही PMMVY CAS यूजर मॅन्युअल मध्ये दिलेल्या सूचनांचे अनुसरण करू शकता.

- गर्भधारणेच्या 6 महिन्यांनंतर, पुन्हा PMMVY CAS सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन करा आणि Second Instalment टॅबवर क्लिक करा आणि user manual मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून फॉर्म 1B भरा.
- मुलाच्या जन्मानंतर आणि CG, OPV, DPT आणि हिपॅटायटीस B च्या लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाल्यानंतर, PMMVY CAS सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन करा आणि Third Instalment टॅबवर क्लिक करा. आणि खालील फॉर्म 1C भरा User Manual मध्ये दिलेली instruction follow करून खालील फॉर्म 1C भरा.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना PMMVY अंतर्गत मातृत्व लाभ घेण्यासाठी ऑफलाईन (Offline) प्रक्रिया:
- ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी गर्भवती महिलांना अंगणवाडी किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणी अर्ज सादर करावा लागेल.
- ज्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील त्यांनी अंगणवाडी केंद्र (AWC) किंवा मान्यताप्राप्त (सरकारी) आरोग्य सुविधेत नोंदणी करणे आवश्यक आहे, जे त्या विशिष्ट राज्य /केंद्रशासित (State/Union) प्रदेशांसाठी अंमलबजावणी विभाग आहे. Registration LMP (Last Menstrual Period) च्या 150 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.
- आवश्यक कागदपत्रे (Documents): योग्यरित्या भरलेला अर्ज 1 ए, MCP कार्डची प्रत(copy), ओळख पुराव्याची प्रत (copy), बँक/पोस्ट ऑफिस खात्याच्या पासबुकची प्रत (copy), अर्जदार आणि तिचा पती यांनी विधिवत स्वाक्षरी (sign) केलेला एक उपक्रम/संमती.
- हा अर्ज AWC/मंजूर आरोग्य सुविधेतून मोफत मिळू शकतो किंवा महिला व बालविकास (Women and Child Development) मंत्रालयाच्या वेबसाईटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो.
- अर्जदाराने भविष्यातील संदर्भांसाठी अंमलबजावणी प्राधिकरणाकडून नोंदणीची पावती (acknowledgement) घ्यावी.
- लाभार्थी (Beneficiary) AWC/मान्यताप्राप्त आरोग्य सुविधेत योग्यरित्या भरलेला फॉर्म 1 बी submit करून pregnancy च्या 6 महिन्यांनंतर एक Antenatal Check-up (ANC) झाल्यावर सांगू शकतो आणि MCP कार्डची एक प्रत (copy) सोबत किमान एक जन्मपूर्व तपासणी (ANC) दाखवू शकतो. दुसरा हप्ता (second installment) pregnancy च्या 180 दिवसानंतर claim करू शकतो.
- तिसऱ्या हप्त्याचा दावा (Third installment claim) करण्यासाठी, लाभार्थीने (Beneficiary) योग्यरित्या भरलेला फॉर्म 1c सोबत बाळ जन्म नोंदणी (Child Birth Registration), आयडी प्रूफ(ID Proof) आणि एमसीपी(MCP) कार्ड सादर करणे आवश्यक आहे ज्यामध्ये मुलाला CG,OPV,DPT आणि Hepatitis B हे लसीकरण (Vaccination) मिळालेले आहे हे समजते.
- पावती स्लिप फॉर्म (acknowledgement) 1A आणि Form 1B दाखवणे देखील आवश्यक आहे. अर्जदाराने जम्मू -काश्मीर (जम्मू -काश्मीर), आसाम आणि मेघालय वगळता सर्व राज्यांमध्ये या टप्प्यावर आधार कार्डाची प्रत(Copy) सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज भरण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही 011-23382393 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.
तर गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सरकारी योजना याबद्दल ही माहिती होती. मी आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्की आवडेल आणि याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
जर या विषयाबद्दल तुमच्या मनात काही शंका (doubts) असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लिहा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.